आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Toddler And Parents Survive Due To Seat Change Before Takeoff In Taiwan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उड्डाणापूर्वी जागा बदलल्याने वाचला तैवानी विमानातील बालकाचा जीव, बघा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैपेई (तैवान)- उड्डाणानंतर लगेच वैमानिकाने नियंत्रण गमावल्याने तैवानच्या ट्रान्सएशिया विमान कंपनीचे विमान काल नदीत कोसळले. या दुर्घटनेत 31 प्रवासी ठार झाले तर 12 अद्याप बेपत्ता आहेत. बचावण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये एका बालकाचा आणि त्याच्या आईवडीलांचा समावेश आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी डावीकडच्या जागा बदलत उजवीकडे जागा घेतल्या होत्या. यामुळे त्यांचे प्राण बचावल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हे बालक अगदी मृत्यूच्या दारातून परतले आहे.
ट्रान्सएशिया विमान कंपनीचे विमान नदीत कोसळण्यापूर्वी विमानतळाशेजारी असलेल्या इमारतींना चुकवत उड्डाणपुलाला आणि त्यावरुन जात असलेल्या टॅक्सीला चाटत गेले. याचा व्हिडिओ एका कारच्या डॅशबोर्डवर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो जाहीर झाल्यावर विमान अपघाताची तिव्रता जगासमोर आली.
या विमानाने उड्डाण करण्यापूर्वी डाव्या पंखातून जोरात आवाज येत होता. यावेळी लीन, त्यांची पत्नी आणि मुलगा डाव्या बाजूला असलेल्या जागांवर बसले होते. आवाजामुळे त्यांनी जागा बदलल्या. ते उजव्या भागातील जागांवर बसले. त्यानंतर विमानाने उड्डाण केले आणि अपघात झाला. विमान नदीत कोसळ्यावर लीन विमानातून बाहेर आले. त्यांनी पत्नीलाही ओढून बाहेर काढले. यावेळी त्यांचा मुलगा पाण्यात तरंगत होता. त्याचा चेहरा पांढराफट पडला होता तर ओठ निळे झाले होते. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थीर आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत कमीत कमी जीवित हानी व्हावी, यासाठी वैमानिकाने बराच प्रयत्न केला. अगदी वायुदलाच्या लढाऊ विमानासारखे विमान उडवले. विमान नदीत उतरवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर अपघात झालाच. यात दुर्दैवी वैमानिकासह 31 प्रवाशांचा मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, अपघाताचे ताजे फोटो... बालकाला वाचवण्यात आल्याचा व्हिडिओ... विमानाचा अपघात होत असतानाचा लाईव्ह व्हिडिओ...