आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING: हजारो वर्षांपासून स्पेनमधील हे शहर आहे पर्वतांच्या खाली, होते पर्यटकांची तुफान गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनमध्ये असे एक शहर आहे जे की पर्वतांमधील गुफांमध्ये वसले आहे. ते शहर हजारो वर्षे जुने आहे. सेटेनिल डी लास बोडेगास नावाच्या या शहराची लोकसंख्‍या जवळपास 3 हजार इतकी आहे. पूर्ण शहर पर्वताच्या खाली असू शकते, यावर या शहराला भेट देणाऱ्याचा विश्वास बसत नाही. सेटेनिलच्या नै‍सर्गिक गुफांंमध्‍ये माणूस अनेक वर्षांपासून राहत आला आहे, असे संशोधक मानतात.

सर्व सुविधांनी संपन्न आहे शहर
हे शहर जागतिक स्तराचे बार, रेस्तरॉंपासून वाइन निर्मिती, ऑलिव्ह तेल, मुरब्बा आणि मधासाठी प्रसिध्‍द आहे. जागतिक दर्जाच्या कारागिरांची संख्‍याही येथे मोठी आहे. सेटेनिलमध्‍ये तुम्ही कधीही या, येथील बाजारपेठा व कॅफे पर्यटकांनी गजबजलेले दिसतील.

कुठे आहे ?
सेटेनिल हे शहर कॅडिज प्रांताच्या ईशान्य भागात जवळजवळ 157 किलोमीटरवर आहे. शहराचे नाव लॅटिन भाषेतील septem nihil पासून घेण्‍यात आले आहे. या शब्दाचा अर्थ होतो सात वेळेस काहीही नाही. सेटेनिल शहर 1484 मध्‍ये नष्‍ट झाले होते. ख्रिस्ती लष्कराने लोकांना घर सोडावयास विवश केले होते. 15 दिवस चाललेल्या संघर्षात त्यांनी किल्ल्यावर वर्चस्व मिळवले होते.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा, पर्वतांच्या खाली वसलेल्या शहराची सुंदर क्षणचित्रे....