आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aafia Siddiqui Pakistan And 9 11 Terrorist News In Marathi

जाणून घ्या, अलकायदा मॉम, कुख्यात दहशतवादी डॉ. आफिया सिद्दिकीबद्दल सबकुछ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकमध्ये शिरच्छेद करण्यात आलेला अमेरिकी पत्रकार जेम्स फोले याला सोडण्यासाठी ISIS ने अलकायदा मॉम आणि कुख्यात दहशतवादी डॉ. आफिया सिद्दिकीला सोडण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आफिया चर्चेत आली आहे. न्युरोसायंसमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या या महिलेवर अल-कायदाशी संबंध ठेवणे आणि दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सध्या अमेरिकेतील तुरुंगात आफियाला ठेवण्यात आले आहे. जाणून घ्या, या डॉक्टर महिलेबाबत सबकुछ...
डॉ. आफिया सिद्दिकीचा जन्म 2 मार्च 1972 रोजी झाला. तिचे वडील महंमद सालेह सिद्दिकी डॉक्टर असून आई इस्मत सोशल वर्कर आहे. तिच्या पतीचे नाव अम्मार बलूची असून त्यांना पाच मुले आहेत.
आफिया लहानपणापासून हुशार होती. पाकिस्तानमध्ये शिक्षण घेत असताना तिला चांगले मार्क पडले होते. त्यांनतर तिने मॅसाचुसेट्स इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. येथूनच तिने डॉक्टरेट केली. यावेळी ती सोशल वर्कर म्हणूनही काम करीत होती.
अफगाणिस्तान, बोस्निया आणि चेचन्यामधील मुस्लिमांवर अत्याचार केले जात आहेत, असे तिला वाटायचे. त्यामुळे तिने अनेकदा बोस्टन येथे धरणे आंदोलन केले. या देशातील लोकांच्या मदतीसाठी पैसे गोळा केले. त्यासाठी स्थानिक मशिदींमध्ये जाऊन धार्मिक स्वरुपाची भाषणे दिली.
पैसे गोळा करण्यासाठी ती ज्या एका संघटनेसोबत काम करीत होती, तीवर केनियात अमेरिकी दुतावासावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामिल असल्याचा आरोप आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर आफिया आणि तिच्या पतीची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. दोघे पाकिस्तानला परत आले. दोघांनी घटस्फोट घेतला.
पुढील स्लाईडवर वाचा, 9/11 च्या मास्टरमाईंडच्या भाच्यासोबत केले लग्न....