आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party Discussed In World Economic Forum At Davos

दाओसच्या जागतिक आर्थिक परिषदेत आम आदमी पक्ष चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाओस - दाओस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये भारतावरील चर्चेत आम आदमी पार्टी आणि लोकसभा निवडणुकीचा मुद्दा प्रकाशझोतात राहिला. परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांनी अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टीच्या उदयाबाबत उत्सुकता दाखवली. बहुतांश विदेशी नेत्यांनी भारतीय नेत्यांकडे या मुद्द्यावर मत आजमावले.
भारतातील काही नेत्यांनी आपच्या यशाला फारसे महत्त्व दिले नाही.
आप दिल्लीकेंद्रित पक्ष असून केवळ गर्दीच्या राजकारणाला भारतीय लोकशाहीत स्थान नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आम आदमी पार्टीला भारतीयांचे मन ओळखण्यात यश मिळाल्याचे त्यांनी कबूल केले. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांनी भारतातील आर्थिक वृद्धीचे वातावरण जोरकसपणे मांडले. मात्र, या वेळी विदेशी नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत बहुमताबाबत साशंकता व्यक्त केली. एका विदेशी नेत्याने दिल्ली दौ-यात केजरीवाल यांची भेटीची इच्छा व्यक्त केली.