आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल हामीद बांगलादेशचे नवे राष्ट्राध्यक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - बांगलादेशचे संसद अध्यक्ष अब्दुल हामीद यांची देशाच्या नूतन राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे. राष्ट्राध्यक्ष जिलुर रहेमान यांच्या मृत्यूनंतर हामीद काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहत होते. हामीद पंतप्रधान शेख हसीना यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जातात. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी बांगलादेश आवामी लीगचे उमेदवार म्हणून त्यांनी रविवारी अर्ज दाखल केला होता. हामीद 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. 1986 ,1991, 1001 आणि 2008 मध्ये ते संसदेवर निवडून गेले होते.