राजकोट- पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 चिमुकल्यांसह 142 नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी याला राष्ट्रीय संकट घोषित करुन तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. पाकिस्तानवर आलेल्या या संकटातून बाहेर पडण्यात समाजसेवक अब्दुल सत्तार ईदी यांनी मोलाची भूमिका बजावली.
दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यावर ईदी फाऊंडेशनच्या अनेक अॅम्ब्युलंस आणि शेकडो समाजसेवी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी त्यांनी जीवाची जराही पर्वा केली नाही. हल्ल्याच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत हे कार्यकर्ते काम करीत होते.
अब्दुल सत्तार ईदी
हे नाव पाकिस्तानमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. जनता त्यांना अनेक नावाने ओळखते. काही त्यांना फरिश्ता म्हणतात, काही फादर तेरेसा तर काही दुसरे गांधी. यांच्या फाऊंडेशनचा पाकिस्तानमध्ये एवढा दबदबा आहे, की यांची अॅम्ब्युलंस फायरिंग सुरु असलेल्या भागात गेली तर तेथील फायरिंग थांबवली जाते. दंगली थांबतात. या अॅम्ब्युलंसवर कुणी दगडफेक करीत नाही, की नुकसान पोहोचवित नाही.
अब्दुल सत्तार यांचा जन्म गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील बांटवा गावात झाला. पाकिस्तान सरकारने त्यांच्या नावाची तब्बल 16 वेळा नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. त्यांना 1996 मध्ये भारताकडून गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुढील स्लाईडवर वाचा, अब्दुल सत्तार ईदी यांच्या आयुष्याशी निगडित काही बाबी...