आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मयोगी अब्राहम लिंकन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला होता. अब्राहम लिंकनचा या निवडणुकीत सक्रिय सहभाग होता. लिंकन दिवसरात्र प्रचारकार्यात असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. निवडणुकीदरम्यान एका धर्मोपदेशकाच्या सभेला गेले. धर्मोपदेशकांनी प्रवचनास सुरुवात केली. लिंकन अधिरतेने ते लांबलेले प्रवचन ऐकत होते. शेवटी धर्मोपदेशकांनी विचारले, कोणाकोणाला स्वर्गात जायचे आहे? बरेच लोक उठून उभे राहिले. नरकात जाण्यासाठी मात्र काही मोजक्याच व्यक्ती उभ्या राहिल्या. लिंकन दोन्ही वेळेस बसूनच होते. धर्मोपदेशकास ही गोष्ट खटकली. तो श्रोत्यांशी बोलताना म्हणाला, जर लिंकन स्वर्ग आणि नरकात जाऊ इच्छित नाहीत, तर त्यांना कोठे जायचे आहे? लिंकन उठून म्हणाले, मी काँग्रेसमध्ये जाऊ इच्छितो. या छोट्याशा संदेशामुळे धर्मोपदेशकांचा प्रश्न निरर्थक असल्याचे दाखवून दिले. जबाबदारी समजून काम करणारा खरा कर्मयोगी असतो. त्यामुळे ईश्वराची त्याच्यावरच कृपा होते.