आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abu Bakr Al Baghdadi Ridiculed For Flashy Wristwatch, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बगदादीच्या हातात चार लाखांचे घड्याळ!, सोशल साइट्सवर उडवण्‍यात आली खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराक आणि सीरियाच्या अनेक भागांवर ताबा मिळवून त्यास इस्लामिक राष्‍ट्र म्हणून घोषित करणा-या दहशतवादी संघटना आयएसआयएसचा ( इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम ) प्रमुख अबु बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ विनोदाचा विषय बनला आहे. संघटनेने प्रसिध्‍द केलेल्या व्हिडिओमध्‍ये बगदादी मुस्लिमांना सं‍बोधित करत होता, त्यावेळी लोकांची नजर त्याच्या हाताकडे होती. कारण त्याने सिल्व्हर कलरचे महागडे घड्याळ घातले होते. याबाबत लोक सोशल साइट्सवर आपली मते नोंदवत आहेत. व्हिडिओमध्‍ये घड्याळ स्पष्‍ट दिसत नाही. परंतु बगदादीने घातलेले घड्याळ रोलेक्स, सेकोंडा किंवा ओमेगासारख्‍या महागड्या ब्रँडसची असण्‍याची शक्यता आहे. बगदादीने घातलेल्या घड्याळाची किंमत 4 हजार पौंड‍ ( चार लाख रूपये ) असल्याचे सांगण्‍यात येत आहे. तुम्हाला येथे दिसत असलेले छायाचित्र हे सोशल साइट्सवर व्हायरल झाले आणि विनोदाचा विषय बनला आहे.

पुढे वाचा... ट्विटरवर कशा पध्‍दतीने बगदादीची उडवण्‍यात आली खिल्ली...