आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abubakar Shekau Northeast Nigeria Islamic Caliphate Latest News In Marathi

नायजेरिया इस्लामी स्टेट, दहशतवादी संघटना बोको हरामने केली घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानो - नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबु बकर शेकूने ईशान्य भाग इस्लामी खलिफा (इस्लामिक स्टेट) म्हणून घोषित केले आहे. रविवारी( ता. 24) संघटनेच्‍या नेत्यांनी व्हिडिओ प्रसिध्‍द केला. त्यात नायजेरियास इस्लामिक स्टेट घोषित करण्‍यात आले आहे. यापूर्वी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरियामध्‍ये इस्लामिक स्टेटची घोषणा केली होती.
मी देवाला धन्यवाद देतो की, त्याने आमच्या बंधूंना ग्वोझावर वर्चस्व निर्माण करण्‍यास मदत केली. त्यास इस्लामी खलिफा म्हणून घोषित केले, असे व्हिडिओत अबु बकर सांगताना दिसतो. शेकू यास अमेरिकेने आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मह‍िन्याभरापूर्वी संयु‍क्त राष्‍ट्राने ग्वोझावर बंडखोरांनी नियंत्रणाखाली आहे, असे सांगितले होते.

बोको हराम नियंत्रित भागा‍तून प्रवास करणे जिकिरीचे आहे. मोबाइलला सिग्नल मिळत नाही. 2013 मध्‍ये या भागात आणीबाणी जाहीर करण्‍यात आली होती, असे एका कार्यकर्त्याने सांगितले. दहशतवादी संघटना उत्तर नायजेरियामध्‍ये इस्लामी स्टेट स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान नागरिकांनी लष्‍करी कारवाईची मागणी केली आहे. अत्याधुनिक शस्त्रांच्या अभावी नायजेरियाच्या सैन्याने कारवाई करण्‍यास नकार दिला आहे.