आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारानंतर अॅसिड अटॅक, 200 सर्जरीनंतर लाभला पहिल्यासारखा सुंदर चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मार्च 2008 च्या त्या भयावह घटनेपूर्वी या महिलेचा चेहरा असाच दिसत होता, जसा सहा वर्षांनंतर आता (छायाचित्रात) दिसत आहे. ही आहे, ब्रिटीश टीव्ही होस्ट केट एलिझाबेथ पायपर उर्फ कॅटी (30). 2008 मध्ये तिचे फेसबुक फ्रेंड डॅनियलसोबत भांडण झाले होते. त्यानंतर डॅनियलने तिला कैद करुन ठेवले. या दरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आला, तिला मारहाण झाली आणि त्यानंतर तिच्या चेह-यावर अॅसिड फेकण्यात आले. या गुन्ह्यासाठी डॅनियलला शिक्षा झाली मात्र, हीच कॅटीच्या संघर्षाची सुरुवात होती.
अॅसिड हल्ल्यामुळे विद्रूप झालेल्या चेह-यासह, कॅटीने अशा नरकयातना भोगणा-या पीडित महिलांसाठी काम करण्याचा निर्धार केला. तिने सुरु केलेल्या कँपेनमुळे या पीडितांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी जमा केला. स्वतः सधन असल्यामुळे त्याचवेळी तिने स्वखर्चाने उपचार करुन घेतले. कॅटीला तिचा चेहरा पूर्ववत करुन घेण्यासाठी तब्बल 200 वेळा सर्जरी करावी लागली. ती म्हणते, 'आता मी पहिल्यासारखीच आनंदी आहे.' तिच्या या आनंदाला 14 मार्चला पारावार उरला नाही, जेव्हा तिने एका मुलीला जन्म दिला. तिने तिच्या नवजात मुलीसह पहिले छायाचित्र काढले आणि ती नव्या चेह-यासह जगासमोर आली.

पुढील स्लाइडमध्ये, अशीच आहे लक्ष्मीची कहानी