आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वार्त्‍झसारखीच कृती जॉब्स आणि व्होजनिएक यांचीही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वार्त्‍झसारखीच कृती जॉब्स आणि व्होजनिएक यांचीही
कोलंबियातील लॉ प्राध्यापक आणि एक्सपर्ट टीम वू यांनी ‘न्यूयॉर्कर’मध्ये लिहिले आहे की, अ‍ॅरोन स्वार्त्झबाबत अशी घटना घडली नसती तर... ? स्टीव्ह जॉब्स किंवा व्होजनिएक यांनाही अशीच वागणूक मिळाली असती तर काय झाले असते? इंटरनेट स्वातंत्र्यातील योद्धा अ‍ॅरोन स्वार्त्झ याने 26 व्या वर्षीच आत्महत्या केली. त्याच्यावर मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे दस्तऐवज लीक करण्याचा आरोप होता. 14 व्या वर्षीच त्याने आरएसएससारखे फॉरमॅट विकसित करून याहू, गुगलसारख्या सर्च इंजिनची सुरुवात करून दिली. स्वार्त्झने जे केले त्यामुळे काहीच नुकसान होणार नव्हते. त्याचे दुष्परिणामही नव्हते. मग स्वार्त्झवर लावण्यात आलेल्या आरोपांची तुलना स्टीव्ह जॉब्स किंवा स्टीव्ह व्होजनिएक यांच्याशी करता येईल का? त्यांनीही 70 च्या दशकात दूरवरील फोन कॉल मोफत करता यावेत यासाठी एटी अँड टी टेलिकॉम सिस्टिम हॅक केली होती. स्टीव्ह व्होजनिएक आणि जॉब्सनी ब्लू बॉक्स डिव्हाइस बनवले होते. त्यांच्या मदतीने जगभरात कोठेही मोफत फोन कॉल करता येत होते. त्यापासून त्यांनी 6 हजार डॉलरही कमावले. पोलिसांनी पकडण्याच्या आत हे बॉक्स बनवणे बंद केले. त्यांचे मार्गदर्शक जॉन ड्रेपर यांना काही महिन्यांची शिक्षाही झाली, पण जॉब्स आणि व्होजनिएक अशा प्रकरणात कधीच अडकले नाहीत. त्यांनी काही दिवसांनंतर जगप्रसिद्ध मॅकिंतोश पीसी बनवले.
हा तेव्हाचा काळ होता, पण 80 च्या दशकात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गंभीर गुन्हेगारांसाठी असतात त्याप्रमाणे कडक कायदे बनले. सरकारी वकील कारमेन ऑ र्टिज यांनी स्वार्त्झसाठी 35 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती.
नाइंथ सर्किट कोर्ट ऑ फ अपीलने गेल्या वर्षी अशा प्रकारचा एक खटला माफ केला होता. अशा प्रकारच्या सर्व केसेस एकाच श्रेणीत ठेवणा-या कायद्याला चीफ जज अ‍ॅलेक्स कोंजिस्की यांनीही नकार दिला होता.

boingboing.net