आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकी चेनचा मुलगा जेसीप्रकरणी सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- कुंग फू सुपरस्टार जॅकी चेनचा मुलगा जेसी याला अमली पदार्थांचे सेवन करणे चांगलेच महागात पडू शकते. शुक्रवारी यासंबंधी खटल्याची सार्वजनिक सुनावणी केली जाईल. ३२ वर्षीय गायक, अभिनेता जेसी चेन आणि तैवान चित्रपट कलाकार को चेन-तुंग यांना अन्य साथीदारांसह गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी जेसीच्या घरून अमली पदार्थ सेवनप्रकरणी पकडण्यात आले होते.
जेसी आणि को यांची तपासणी पॉझिटिव्ह आली होती व दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून १०० ग्रॅम गांजा जप्त केला होता. २२ डिसेंबर रोजी चेनविरोधात अमली पदार्थ पुरवण्याचाही आरोप करण्यात आला.