(फोटो- अॅडम ओप्रिस यांनी टिपलेली नववधूंचे अंडरवॉटर फोटो.)
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील फोटोग्राफर अॅडम ओप्रिस यांनी देखण्या नववधूंचे अप्रतिम अंडरवॉटर फोटो टिपले आहेत. लग्न आणि लाइफस्टाईल या थीमवर फोटो काढणारे ओप्रिस यांनी नुकतेच प्रेग्नेंट महिलांचे अंडरवॉटर फोटो काढले होते. त्याला लोकांची खुप पसंती मिळली होती. आता त्यांनी अंडरवॉटर नववधूंचे फोटो टिपले आहेत. यात नववधूंना मत्सकन्यांचे रुप देण्यात आले आहे.
यासंदर्भात ओप्रिस सांगतात, की मी इतर फोटोग्राफर्ससारखा नाही. मला त्याच त्या पठडीतले फोटो काढायला आवडत नाहीत. मला काही तरी हटके करायचे आहे. त्यामुळे मी नववधूंचा अंडरवॉटर अवतार सादर केला आहे. मला समुद्राच्या आत राहणाऱ्या जिवांची फोटोग्राफी करायला आवडते. समुद्रात डायव्हिंग करताना लोकांना बघितले तेव्हापासून मला त्यांना शुट करायचे होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अॅडम ओप्रिस यांनी काढलेली ही अप्रितम छायाचित्रे...