आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adolf Hitlers Torture On Jewish In Auschwitz Camp Polland

हिटलरने ज्यूंचा केला छळ, 6 वर्षांमध्‍ये मारले 60 लाख लोकांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1933 साली जर्मनीच्या सत्तेची सूत्रे अॅडॉल्फ हिटलरच्या हाती अाली. आणि तेथे त्याने वंशद्वेषी साम्राज्य स्थापन केले. नंतर हिटलरने ज्यूंना दुय्यम स्थान देण्‍यास सुरुवात केली होती. तसेच त्यांचे माणूसपणही नाकारण्‍यात आले होते. तीव्र तिरस्कारामुळे हिटलरने ज्यूंचे नरसंहार घडवून आणले. त्यांचा समूळ नायनाट करण्‍यासाठी योजनाबध्‍द कार्यक्रम त्याने ओखला होता.

हिटलरने घडवून आणलेला नरसंहाराची घटना ज्यूंच्या इतिहासात काळ्या अक्षराने लिहिण्‍यात आली आहे. यात 60 लाख लोकांची हत्या करण्‍यात आली होती. त्यापैकी 15 लाख फक्त चिमुकल्यांचा समावेश होता.या दरम्यान अनेक ज्यूंनी जर्मनी सोडून इतर देशात आश्रय घेतला होता, काही जण कॉन्ट्रेशन कॅम्प्समधील छळवणूकींनी मृत्यूमुखी पडले होते.

पोलंडमधील छळवणूक कॅम्पमध्‍ये धर्म, वंश, विचारसरणी किंवा शारीरिक दुर्बलतेच्या नावाखाली नाझींच्या गॅस चेंबरमध्‍ये पाठवण्‍यात येत असे. कॅम्पमध्‍ये ज्यू, राजकीय विरोधक, रुग्ण आणि समलिंगींकडून जबरदस्तीने काम करुन घेतले जात होते. कोणालाही कॅम्पमधून पळून जाणे शक्य नव्हते. म्हातारे आणि आजार व्यक्तींचा गॅस चेंबरमध्‍ये जीवन यात्रा संपत असे. कॅम्प जवळ चार क्रिमेटोरियम होते, जिथे दररोज 4 हजार 700 मृतदेहांचे दहन केले जात होते. सोव्हिएत संघाच्या लष्‍कराकडून 27 फेब्रूवारी 1945 पर्यंत ज्यूंची मुक्तता करेपर्यंत जवळजवळ 11 लाख लोकांची हत्या करण्‍यात आली होती. 1947 साली पोलिश संसदेने एक कायदा संमत करुन कॅम्पचे संग्रहालयात रुपांतर केले आहे.

पुढे पाहा, ऑशविच कॅपमध्‍ये कैद्यांची कशी करण्‍यात आली छळवणूक...