आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन धोरणाचा भारतीयांना फायदा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेने इमिगे्रशन धोरणात सुधार केला असून त्याचा तेथे राहणा-या सुमारे 2.40 लाख भारतीयांना थेट फायदा होणार आहे. हे भारतीय आता अमेरिकेत अधिकृतरीत्या निवास करणे तसेच काम करण्यास पात्र ठरणार आहेत. अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या सिनेटरांच्या एका गटाने ही योजना जाहीर केली होती. तिच्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सध्या जगभरातील सुमारे 1.10 कोटी लोक अमेरिकेत अवैधरीत्या राहत आहेत. हे नवे धोरण लागू झाल्यावर फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, तर इतर सर्व नागरिकांना काही अटी आणि नियमांच्या आधारे अमेरिकेत राहण्याचा व काम करण्याचा अधिकार मिळेल, अशी माहिती डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर चक शूमर यांनी सांगितले. येत्या मार्चअखेर या योजनेला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल, अशी आशा सिनेटर्सकडून वर्तवली जात आहे.

अवैध निवासात भारत सहावा : अमेरिकेत अवैधरीत्या राहण्याच्या बाबतीत भारतीय नागरिकांचा सहावा क्रमांक आहे. यामध्ये मेक्सिको, अल साल्वाडोर, ग्वाटेमाला, होंडुरास आणि फिलिपाइन्स या देशांपाठोपाठ भारतीय नागरिकांचा क्रमांक आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही संख्या झपाट्याने
वाढते आहे.