आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युट्यूब पाठोपाठ फेसबुकवरही येणार जाहिरातीचे फॅड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्युयॉर्क- युट्यूब या व्हिडिओ संकेतस्थळानंतर फेसबुक या सोशल मीडिया संकेतस्थळावरही जाहिरातीचे फॅड येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जाहिरातीचे टाइम स्लॉट विकून प्रतिदिवस २५ लाख डॉलर्स कमविण्याची योजना फेसबुकने आखली आहे. त्यामुळे फेसबुकवर एखादा व्हिडिओ बघताना आश्चर्यचकित होऊ नका.

फेसबुकचे जगभरात ११५ कोटी युजर्स आहेत. त्यातील बहुसंख्य युजर्स भारतातील आहे. भारतातील फेसबुकच्या युजर्समध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेसबुकने सध्याच व्हिडिओ जाहिरातीची योजना जाहीर केली नसली तरी येत्या वर्षभरात व्हिडिओ जाहिराती सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

फेसबुकची स्पर्धक असलेल्या गुगलने युट्यूब या संकेतस्थळावर व्हिडिओ जाहिरातींचे स्पॉट विकण्यात सुरवात केल्यानंतर फेसबुकचीही या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. फेसबुकवर सुरवातील १५ सेकंदांचे स्पॉट विकण्यात येणार आहेत.

फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरील सॅंडबर्ग यांनी सांगितले, की...

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...