आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रच शत्रू कसे बनले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांवर अफगाण नॅशनल सिक्युरिटी फोर्सच्या (एएनएसएफ) हल्ल्यांमुळे अमेरिकन धोरणतज्ज्ञ अवाक झाले आहेत. इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टन्स फोर्सच्या (आयएसएएफ) मते अफगाण सैनिकांची अमेरिकन लष्करावरील हल्ल्यांची संख्या 2007 मधील दोनवरून वाढून 2012 मध्ये 64 झाली आहे. 2013 मध्ये आतापर्यंत नऊ हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी हल्ल्यांची संख्या वाढल्यावर सेनेने ते थोपवण्याचे प्रयत्न केले. हल्ल्यांचे प्रकार कमी करण्यासाठी संयुक्त गस्तीची संख्या कमी करण्यात आली आहे.

या प्रकारच्या घटनांची दोन मुख्य कारणे समोर आली आहेत. अफगाणी पोलिस आणि सेनेत तालिबानी किंवा मूलतत्त्ववाद्यांची घुसखोरी आणि सांस्कृतिक किंवा खासगी समस्या. प्रत्येक बाजू आपल्या परीने कारणांचा अर्थ लावते. नाटोच्या संयुक्त फौजांचे सूत्र 75 टक्के हल्ल्यांमागे वयक्तिक कारण असल्याचे मानतात. माजी मंत्री आणि अध्यक्षपदाचे दावेदार हनीफ ऐतमार बहुतांश हल्ल्यांचे कारण घुसखोरीचा परिणाम असल्याचे सांगतात. तरीही कित्येक प्रकरणांमध्ये कारणे स्पष्ट होऊ शकत नाहीत. अशीच एक घटना 10 ऑगस्ट 2012 रोजी हेल्मंद प्रांतातील सेंगुनमध्ये घडली होती. अफगाण फोर्सचा वीस वर्षीय जवान अब्दुल रज्जाकने स्पेशल ऑपरेशन टीम 8133 च्या तीन अमेरिकन मॅरिन्सला गोळ्या घातल्या.

टाइमने घटनेची माहिती घेण्यासाठी टीम 8133 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याची परवानगी नाही मिळाली. रज्जाक 2010 च्या प्रारंभी अफगाण राष्ट्रीय पोलिसांत भरती झाला होता. त्याला सैफुल्ला खान यांनी नावा जिल्ह्यात तैनात केले होते. लवकरच सैफुल्ला गिरिष्क जिल्ह्याचे पोलिसप्रमुख बनले. अब्दुर्रज्जाक त्यांचा अंगरक्षक बनला. अंगरक्षक असल्याने त्याला सैफुल्लासोबत तालिबानी नेत्यांचा पाठलाग करणे, अफू व स्फोटकांचा तपास लावणे यांसारख्या धोकादायक मोहिमांवर जावे लागत होते.

अमेरिकन आणि अफगाणी सैनिकांना एकमेकांविषयी अनेक तक्रारी आहेत. जलालाबाद येथील अमेरिकन कमांडतर्फे झालेल्या एका अभ्यासानुसार अमेरिकन सैनिकांना आपल्या अफगाणी साथीदारांविरुद्ध स्वच्छतेविषयी तक्रार होती. विश्वासाचे संकट आणि सांस्कृतिक दुरावा नावाचा हा अभ्यास 2011 पर्यंत गोपनीय नव्हता. त्यात म्हटले आहे की, अमेरिकनांवर अफगाणींचे हल्ले निरंतर वाढणारा धोका आहे. यामागे मुख्यता गैरसमज, खासगी समस्या आहेत.

अमेरिकनांच्या आणखी काही तक्रारी आहेत. अमलीपदार्थांचा वापर, वाढत्या चोर्‍या, वयक्तिक अस्वस्थता, प्रामाणिकपणाचा अभाव, दुबळेपणा, शस्त्रांचा असुरक्षित रितीने वापर, भ्रष्ट अधिकारी, बंडखोरांशी छुपे साटेलोटे, दुबळे मनोबल, आळशीपणा आणि कुत्र्यांना मारणे.

अफगाणींच्या गंभीर तक्रारी आहेत. तपासणीत महिलांना त्रासदाक बनणे, एएनएसएफ सदस्यांची झडती, शिवीगाळ करणे, अमेरिकन सैनिकांकडून नागरिकांची हत्या, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, जनावरांवर विनाकारण गोळ्या झाडणे.
मरिन्सची हत्या करणार्‍या अब्दुर्रज्जाकच्या विश्वात आपण परतू. एका बाँबस्फोटात सैफुल्लाच्या मृत्यूनंतर रज्जाकच्या हाती त्याची शस्त्रे आणि गणवेश येतात. परंतु काही दिवसांनंतर तो काबूलला पळून जातो. तो सेनेच्या 111 व्या कॅपिटल कोरमध्ये सामील होतो. यादरम्यान, अमेरिकनांकडून बगराम विमानतळावर कुराणाच्या प्रती जाळण्याच्या बातमीमुळे देशभर अमेरिकाविरोध भडकतो. काही दिवसांनंतर रज्जाक काबूलहून हेल्मंदला पळून येतो. पळपुटा असूनही अफगाण पोलिसांत त्याला स्थान मिळते. त्याला पुझेहमध्ये मॅरिन स्पेशल ऑपरेशन टीम 8133 च्या तळाजवळ एका इमारतीत तैनात केले जाते.

मरिन टीमचे कॅप्टन मॅट मेनुकियनला तिथे हैदरच्या नावानेही ओळखले जात होते. कॅप्टन हैदर प्रत्येक आठवड्याला गावच्या बुजुर्ग लोकांची बैठक शूरा आयोजित करायचा. स्थानिक अफगाणी लोकांशी सुसंबंध प्रस्थापित करण्यासाठी हे आयोजन होत असे. येणार्‍या ज्येष्ठांची झडती घेतली जात नसे. त्यांचे स्वागत पाणी, पेप्सी आणि केकने होत असे. रात्री 11.30 वाजता शूरा संपल्यानंतर लोक झोपायला निघून जातात. थोड्या वेळाने रज्जाक गणवेश घालतो. बंदूक उचलतो. आणि तळाच्या आत घुसून ‘अल्लाहो अकबर’ ओरडत मरिन्सवर अंदाधुंद गोळ्यांची बरसात करतो. चार मरिन्स जखमी होतात. त्यात तिघांचा मृत्यू होतो. रज्जाक पळून जातो.

‘सरकारमध्ये सामील झाल्यानंतरदेखील वाटत होते की, मी मुजाहीद आहे आणि मला काफिरांना मारायचे आहे.’, असे सांगत असलेला रज्जाकचा व्हीडिओ तालिबानने जारी केला. अफगाण गुप्तवार्ता विभाग एनडीएस म्हणतो की, रज्जाक तालिबानच्या संपर्कात होता, मात्र सुरुवातीपासून नव्हता. असो, सध्या रज्जाकचा ठावठिकाणा नाही. काही म्हणतात, तो अफगाणिस्तानात आहे, काही म्हणतात तो पाकिस्तानला पळाला. अशीही माहिती मिळते की, सँगीन जिल्ह्यातील गावांत त्याच्यावर लोकांनी फुले उधळली आणि त्याला पैसे दिले.
सोबत मुहीब हबिबी व वालिद फझली