आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणच्या राष्ट्राध्यक्षांनी नावातून ‘अहमदझाई’ वगळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सर्व सरकारी विभाग आणि माध्यमांना आपले ‘अहमदझाई’ हे पारंपरिक नाव वगळण्याचे आदेश दिले आहेत. घनी यांच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसमधून सर्व प्रशासकीय कार्यालयांना गेल्या आठवड्यात यासंबंधी एक पत्र पाठवण्यात आले. अहमदझाई ही अफगाणिस्तानातील मोठी पश्तुन आदिवासी जमात आहे. जमातीची भौगोलिक ओळख दर्शवण्यासाठी अनेक लोकांच्या नावाच्या अखेरीस जमातीचे नाव जोडलेले असते. मात्र, राष्ट्रीय ओळखपत्रावर येणा-या नावानेच आपण ओळखले जावे, अशी घनी यांची इच्छा आहे.