काबूल- अफगनिस्तानात एका व्यसनी पतीने त्याच्या पत्नीचे नाक आणि ओठ कापून टाकल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने तिच्या व्यसनी पतीला तिचे दागिने विकण्यास विरोध केला होता. त्याचा राग आल्याने तिला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर चाकूने तिचे नाक आणि ओठही कापले.
अफगनिस्तानातील हेरातमध्ये ही घटना घडली. सेतारा असे पीडित महिलेचे नाव असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिला चार मुले आहेत. या घटनेवरून अफगनिस्तानातील महिलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
30 वर्षीय पीडितेचा पतीला ड्रग्सचे व्यसन आहे. त्यामुळे तो तिला नेहमी रुपये मागायचा. एके दिवशी तर त्याचे तिचे दागिने मागितले. परंतु तिने दागिने देण्यास विरोध केल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घातला आणि नाक आणि ओठ कापून टाकले. तूर्कीतील रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना अटक केली असून पोलिस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सविस्तर वृत्त...