आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्‍तानच्‍या राष्‍ट्रपती भवनावर हल्‍ला करणारे सर्व तालिबानी ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल- अफगाणिस्‍तानचे राष्‍ट्रपती हामिद करझाई यांच्‍या निवासस्‍थानावर दहशतवादी हल्‍ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रांसह राष्‍ट्रपतींच्‍या निवासस्‍थानात घुसुन बेछूट गोळीबार केला. यावेळी करझाई नेमके कुठे होते, हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. मात्र, ते एक पत्रकार परिषद घेणार होते. त्‍यासाठी काही पत्रकारही दाखल झाले होते. हे पत्रहारही राष्‍ट्रपती भवनात अडकले आहेत. राष्‍ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्‍ये भीषण चकमक झाली. त्‍यात सर्व तालिबानी दहशतवादी ठार झाले.

हा हल्‍ला तालिबानने केला आहे. अमेरिकेने अलिकडेच मोठ्या प्रमाणावर सैन्‍य माघारी घेतले आहे. लवकरच संपूर्ण सैन्‍य माघारी घेऊन अफगाणिस्‍तानच्‍या लष्‍कराकडे संपूर्ण सुत्रे सोपविण्‍यासाठी अमेरिकेने पावले उचलली आहेत. याचदरम्‍यान तालिबानशी चर्चा करु अफगाणिस्‍तानात शांतता आणि लोकशाहीच्‍या मार्गाने सरकार स्‍थापन करण्‍यासाठीही प्रयत्‍न सुरु आहेत. तालिबानला चर्चेसाठी आमंत्रणही देण्‍यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर हा हल्‍ला झाला.

राष्‍ट्रपती भवनाच्‍या जवळपासच्‍या परिसरात बाजारपेठ आहे. याच भागात संरक्षण मंत्रालयासह अनेक देशांचे दूतावासही आहेत. याशिवाय अमेरिकेची गुप्‍तचर संस्‍था 'सीआयए'चेही कार्यालय आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार करतानाच काही ग्रेनेड्सही फेकले. स्‍फोटाच्‍या आवाजामुळे अमेरिकेचे सैनिक तिथे पोहोचले. अमेरिकेच्‍या सैनिकांचीही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु झाली. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी 6 बॉम्‍बस्‍फोट केले.