आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghanistan's Biggest ever Truck Bomb Defused In Kabul

अफगाणिस्तानात 8 टन वजनी बॉम्ब सापडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - अफगाणिस्तानात सुरक्षा यंत्रणेला एका ट्रक बॉम्बला निकामी करण्यात यश आले. त्यामुळे मोठी हानी टळली आहे. राजधानीत ही कारवाई करण्यात आल्याचे गुप्तहेर विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. ट्रकमध्ये सुमारे आठ टन वजनाची स्फोटके सापडली आहेत. गेल्या काही वर्षांत दहशतवाद्यांनी राजधानी काबूलला सातत्याने लक्ष्य केले. याच आठवड्यात हा बाँब सापडला आहे. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत 5 दहशतवादी ठार झाले होते. गेल्या आठवड्यात आत्मघाती हल्लेखोराने शहरातील संरक्षण मंत्रालयावर हल्लाबोल केला होता.जून 2011 मध्ये इंटरनॅशनल हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले होते. त्याचवर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटीश कौन्सिलला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात 12 जण ठार झाले होते.2012 मध्येही दोन हल्ले झाले होते.