आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 वर्षांनंतरही उजळणारा बल्ब !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अगदी कितीही अत्याधुनिक बल्ब वापरला तरी त्याचे आयुष्य जेमतेम वर्षभरापुरतेच असते. मात्र, ब्रिटनमध्ये 1883 मधील एक बल्ब अजूनही उजळत आहे. जगातील हा सर्वात जुना बल्ब ठरला आहे.

बल्बमध्ये ज्योतीसाठी सहा तारा आहेत. त्याचे उत्पादन 1883 मध्ये झाल्याचे त्यावर दिसून येते. 130 वर्षांपासून हा बल्ब अजूनही चांगली सेवा देऊ लागला आहे. अर्थात या बल्बने दोन महायुद्धे पाहिली आहेत. नवीन सहस्रकातही त्याची सेवा चांगली आहे, ही बाब कोणाला चकित करणारी आहे. मोरकॅम्बे येथे राहणा-या फ्लोरेन्स क्रूक यांचे घर या बल्बने अजूनही उजळून निघाले आहे. सुरुवातीला त्यांनी आपली शाळा प्रकाशमान केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा केनेथने तो वापरला. आता त्यांची पत्नी बेथ (79) यांना त्याचा उपयोग होत आहे.

‘एडिस्वान’चे चिन्ह
ऐतिहासिक बल्बवर ‘एडिस्वान’ असे इंग्रजी शब्दातील चिन्ह आहे. ब्रिटनमध्ये याअगोदरचा बल्ब 113 वर्षे जुना होता. एडिस्वान कंपनी सर जोसेफ स्वान यांची असून त्यांचा आणि अमेरिकी संशोधक थॉमस एडिसन यांच्यात सहकार्य करार होता. एडिसन यांनी 1879 मध्ये बल्बचा शोध लावला होता.