आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 1300 Years Four Valconao Eratted With Same Time

1300 वर्षांनी एकाच वेळी चार ज्वालामुखींचा उद्रेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रशियन बेटावरील कामचाटका येथे चार ज्वालामुखी सक्रिय आहेत. 170 किलोमीटर परिसरात या चार ज्वालामुखींचे क्षेत्र आहे. सुमारे 1300 वर्षांपूर्वी या चार ज्वालामुखींचा स्फोट झाला होता. तो खूप भयंकर होता. तसेच नुकसान आजही होईल अशीच भीती रशियन प्रशासनाला वाटत आहे. 2010 पासूनच दक्षिणेतील किसिमन ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडू लागला आणि तो आजही सक्रिय आहे. उत्तरेतील शेवलच ज्वालामुखीतून चार वर्षांपासून राख आणि लाव्हा उत्सर्जित होत अहे. 1000 वर्षे निष्क्रिय राहिलेला बेस्मजानी हा ज्वालामुखी 1950 च्या दशकात भयंकर स्फोट होऊन सक्रिय झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत सक्रिय आहे. या ज्वालामुखीवर नेहमी राखेचे ढग तयार झालेले असतात.

नुकत्याच सक्रिय झालेल्या ज्वालामुखीचे नाव टोबाल्चिक असे आहे. त्यातून गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरपासून लाव्हा बाहेर पडत आहे. या चारही ज्वालामुखीतील लाव्हा एकाच स्रोतातून बाहेर पडत नसल्यामुळे ही ज्वालामुखीय परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. अशा वेळी हे ज्वालामुखी शांत होण्याची काहीच चिन्हे नाहीत. सध्या लाव्हा उत्सर्जन करणारे हे ज्वालामुखी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय झाले आहेत. एअरपानो या रशियन फोटोग्राफी कंपनीने ज्वालामुखीच्या वरील भागात झेपावून अद्भुत फोटो काढले आहेत. तसेच 360 डिग्री परिसराचा व्हिडिओदेखील शूट केला आहे.
airpano.com