आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 16 Air Hostesses Disappeared In Canada, PIA Mulls Disciplinary Departmental Action Against Them

पाकिस्तान एअरलाइन्सच्या 16 एअर होस्टेस बेपत्ता, शोधण्याऐवजी कारवाईचे तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानची सरकारी हवाई वाहतूक कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआए) 16 एअर होस्टेस आणि क्रू मेंबर गेल्या पाच महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. पाकिस्तानातून कॅनडात गेलेल्या विमानात हे सर्वजण होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याऐवजी पीआयएच्या प्रवक्त्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहे.
एआरवाय न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, पाच महिन्यांत पाकिस्तानातून कॅनडात गेलेल्या विमानातील 16 एअर होस्टेस आणि क्रू मेंबर बेपत्ता झाले. गेल्या महिन्यात पीआयएच्या चार एअर होस्टेस बेपत्ता झाल्या. पीआयएचे पायलट आणि एअर होस्टस ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या तिथून त्या बेपत्ता झाल्या. परतीच्या प्रवासासाठी त्या फ्लाइटमध्ये आल्याच नाही.
पीआयएच्या प्रवक्त्याने एअर होस्टेस बपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यासाठी त्या स्वतःच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एअर होस्टेस स्वतः हॉटेलमधून निघून गेल्या. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच या एअर होस्टेस आणि क्रू मेंबरसोबत इंटरनॅशनल एव्हिएशन कायद्यानुसारही कारवाई होईल असे, ते म्हणाले.
आर्थिक अडचणीमुळे झाल्या बेपत्ता ?
पीआएच्या महिला कर्मचारी बेपत्ता होण्यामागे पाकिस्तानच्या हवाई वाहतूक कंपनीची आर्थिक स्थिती जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पीआयएकडे 17 हजार कर्मचारी आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त 36 एअरक्राफ्ट आहेत. त्यातील 10 नादुरुस्त असल्यामुळे उड्डाण घेण्यास सक्षम नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, पीआयएचे कर्मचारी बेपत्ता होण्यामागे कंपनीचे त्यांच्यावरील नियंत्रण संपले आहे. त्यांच्या प्रशिक्षणात बरच्या चुका राहिल्यामुळे त्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
पीआयए कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे कयास लावला जात आहे, की त्या कॅनडामध्ये इतर पर्याय शोधत असल्या पाहिजे.
तस्करीच्या आरोपात एअरहोस्टेस
गेल्या महिन्यात कस्टम अधिकार्‍यांनी पीआयएच्या काही एअर होस्टेस आणि क्रू मेंबरला आयफोन 6 ची तस्कारी करताना पकडले होते. त्याशिवाय गेल्या आठवड्यात मिलान एअरपोर्टवर पीआयएच्या एका एअरहोस्टेसला 9 किलो ड्रग्ससह अटक केली होती.