आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Eight Years First Time Honkong Disney Land Make Profit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ वर्षा नंतर पहिल्यांदाच हाँगकाँग डिस्नेलँडला नफा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग- आठ वर्षांपूर्वी सुरू झाल्यापासून हाँककाँगमधील डिस्नेलँड 2012 मध्ये पहिल्यांदाच नफा झाला आहे. मागील वर्षात विक्रमी पर्यटकांनी डिस्नेलँडला भेट दिल्याने महसुलात वाढ झाली आणि आर्थिक संकटात सापडलेल्या डिस्नेलँडला मोठाच आधार मिळाला. 29 सप्टेंबर 2012 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात डिस्नेलँड पार्कने 109 दशलक्ष डॉलर एवढा महसूल कमावला. त्याआधीच्या आर्थिक वर्षात पार्कला 237 दशलक्ष डॉलरचा तोटा झाला होता. 2012 मध्ये या पार्कला 6.73 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली.

हाँगकाँगमधील रहिवाशांचाही पार्ककडे ओढा वाढला. त्यात 21 टक्के वाढ झाली. त्यामुळे डिस्नेलँडच्या महसुलात तब्बल 18 टक्के वाढ झाली. महसुलात झालेली वाढ आश्वासक असल्याचे पार्कचे व्यवस्थापकीय संचालक अँड्र्यू कॅम यांनी म्हटले आहे. चीनने शांघायमध्ये डिस्नेलँड पार्क उभारण्यास परवानगी दिल्यामुळे या पार्कचे भवितव्य अधांतरी लटकले होते.