आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After James Foley Another Life In Hand Of British Jihadist

आठ अब्ज रुपये आणि लेडी अल-कायदाच्या मुक्ततेसाठी जिहादींनी कापले पत्रकाराचे शीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेचे पत्रकार जेम्‍स फॉली यांच्या बदल्यात 8 अब्ज रुपये आणि कुख्यात महिला दहशतवादी आफिया सिद्दीकीच्या मुक्ततेची मागणी केली होती. अमेरिकेने या दोन्ही मागण्या धुडकावून लावल्यानंतर फॉली यांची हत्या करण्यात आली.
तीन मुलांची आई असलेली आफिया अमेरिकेच्या टेक्सासमधील तुरुंगात आहे. तिला 86 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुळची कराची, पाकिस्तान येथील आफियाला 2008 मध्ये अफगाणिस्तानमधून अटक करण्यात आली होती. तिने एमआयटी येथून शिक्षण घेतल असून ती न्यूरोसर्जन आहे. अफगाणिस्तानात तिला 'लेडी अल-कायदा' म्हणूनही ओळखले जाते.
दुसरीकडे फॉली यांचे शीर कलम करणारा आयएसआयएसचा दहशतवादी ब्रिटीश नागरिक असल्याचे समोर आल्यानंतर ब्रिटनने कट्टतेकडे झुकलेल्या लोकांचा शोध सुरु केला आहे. स्कॉटलँड यार्डचे एमआय-5 आणि एफबीआयनुसार आयएसआयएसचा दहशतवादी ब्रिटीश युवकांचा नेता 'बीटल्स' असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याला जॉन नावाने देखील ओळखले जाते.

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन म्हणाले, की इराक आणि सीरियामध्ये जिहादच्या नावाखाली हैदोस घालणार्‍या दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी अमेरिकेचे दुसरे पत्रकार स्टिव्हन जॉएल सोटलॉफ यांची देखील हत्या केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. कारण, पत्रकार फॉलीच्या शीरकाणानंतर दहशतवाद्यांनी त्याच व्हिडिओच्या शेवटी पत्रकार स्वटव्हन यांना कॅमेरासमोर आणले होते. दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांनी हवाई हल्ले बंद केले नाही, तर दुसर्‍याचे देखील तेच हाल केले जातील. मात्र, त्यानंतरही अमेरिकेचे हवाई हल्ले सुरूच आहेत. अमेरिकी नागरिकांना ठार करण्याच्या आयएसआयएसच्या धमकीवर अमेरिकन सरकारने आमची स्मरणशक्ती कमजोर नसल्याचे म्हटले आहे.
पत्रकार फॉली यांच्या हत्येचा व्हिडिओ समोर आल्यानतंर कॅमरुन सुटीवरुन तत्काळ लंडनला परतले. ब्रिटीश दहशतवादी जॉनसह ब्रिटनचे अनेक नागरिक जिहादच्या नावाखाली सीरिया आणि इराकमध्ये आयएसआयएसच्या सोबतीने दहशत पसरवत आहेत. तज्ज्ञांच्या मते ते अतिशय निर्दयी आणि चपळ आहेत.
छायाचित्र - जेम्स फॉली यांच्यानंतर आता पत्रकार स्टिव्हन जॉएल सोटलॉफ ब्रिटीश जिहादींच्या निशाण्यावर आहे.

पुढील स्लाइडमध्ये, हे आहेत ब्रिटीश नागरिक जे जिहादच्या नावाखाली सीरिया आणि इराकमध्ये रक्ताची होळी खेळत आहेत.