आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Rejection By Lover Pope Turned To Spirituality And Religion

प्रेमिकेने नाकारल्‍यानंतर पोप वळले होते धार्मिकतेकडे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्‍येक यशस्‍वी व्‍यक्तीच्‍या पाठीशी एक महिला असते, असे म्‍हटले जाते. हे वाक्‍य नवे पोप जॉर्ज मारियो बर्गोलियो यांच्‍यावरही लागू पडते. परंतु, ते 12 वर्षांचे होते तेव्‍हाच ही महिला त्‍यांच्‍या आयुष्‍यातून निघून गेली आणि तिच्‍या जाण्‍यानेच ते चर्चकडे वळले.

जॉर्ज यांच्‍या लहानपणीची प्रेमिका अमालिया डामोंटी हिने दावा केला आहे की, जॉर्ज यांचे प्रपोझल तिने नाकारले होते. त्‍यामुळे ते चर्चकडे वळले. जॉर्ज यांचे ते पहिले प्रेम होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या आयुष्‍यात दुसरी महिला आली की नाही, हे माहिती नाही. परंतु, त्‍यांच्‍या पोप बनण्‍यामागे माझेही योगदान आहे, असे अमालिया म्‍हणाली. ती सध्‍या 76 वर्षांची आहे. तिने गुरुवारी रात्री काही वृत्त वाहिन्‍यांसमोर या गोष्‍टीचा खुलासा केला.


अमालिया पोप यांच्‍या शेजारीच ब्‍यूनर्स आयर्समध्‍ये लहानाची मोठी झाली. जॉर्ज पोप झाले त्‍यावेळी तिला आश्‍चर्याचा धक्‍काच बसला. लहानपणीचा मित्र आता पोप झाला आहे, यावर तिचा विश्‍वासच नव्‍हता. ती सध्‍या एक पेंशनर आहे.