आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरॉर्डनंतर सर्वात श्रीमंत व्‍यक्तीनेही फ्रान्स सोडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बर्नार्ड अरनॉल्ट हे फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्व आहे. पण लवकरच ते फ्रान्स सोडणार आहेत. बर्नार्ड लवकरच अब्जावधींची मालमत्ता घेऊन बेल्जियमला जाणार आहेत. लक्झरी वस्तूंचे उत्पादन करणा-या या बिझनेस टायकूनचे म्हणणे आहे की, कर वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर कंपनी नेहमीसाठी त्यांच्या कुटुंबासोबत असावी यासाठी त्यांनी बेल्जियमला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे फ्रेंच राष्ट्रपती फ्रां स्वां ओलांद यांच्या करविषयक धोरणांवरून वाद निर्माण झाला आहे. कराच्या बोजामुळे फ्रान्समधील धनिक लोक पलायन करत असल्याचे टीकाकारांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी तेथील प्रसिद्ध अभिनेता जेरार्ड डेपार्ड्यू कर वाचवण्यासाठी फ्रान्स सोडून गेला आहे.


dailybeast.com