आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Tri Valley Visa Scam In Another Us University

अमेरिकी विद्यापीठात पुन्हा व्हिसा घोटाळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील हर्गुआन विद्यापीठात एक व्हिसा घोटाळा उघडकीस आल्याने शेकडो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. कॅलिफोर्नियास्थित या विद्यापीठाच्या सीईओला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ट्राय व्हॅली विद्यापीठात असाच एक घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुमारे 1500 भारतीय विद्यार्थी अडचणीत आले होते. फेडरल तपास अधिका-यांनी गुरुवारी सन्नीवेलस्थित हर्गुआन विद्यापीठात छापा टाकला.
विद्यापीठाचे सीईओ जेरी वँग यांच्यावर बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश दिल्याचा आरोप आहे. वँग यांच्यावर अशा 15 प्रकरणात आरोप ठेवण्यात आले आहेत. विद्यापीठात सुमारे 450 परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील बहुतांश भारतीय आहेत. वँग त्यांच्यावर असलेल्या सर्व आरोपांत दोषी ठरले तर त्यांना 85 वर्षांची शिक्षा आणि लाखो डॉलरचा दंड होऊ शकतो. तपास पथकाने दहा पानी आरोपपत्रात वँग यांच्या आई-वडिलांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांच्यावर 2007 ते 2011 दरम्यान बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकी व्हिसा मिळवून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वँग कुटुंबाने विद्यार्थ्यांकडून ट्यूशन फी आणि इतर काही रक्कम घेऊन बनावट दस्तऐवज तयार केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणात ट्राय व्हॅली विद्यापीठाचे अध्यक्ष जियाओ पिंग यांना अटक करण्यात आली होती. नंतर हे विद्यापीठाच बंद करण्यात आले.
या प्रकरणात केंद्रीय तपास पथकाने हरगॉन विद्यापीठावर छापा टाकला. गुरूवारी वँग यांना अटक करण्यात आली. बँग हे दोषी ठरले तर त्यांना कमाल 85 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या शिवाय त्यांना दहा लाख डॉलर्स एवढा दंड देखील होण्याची शक्यता आहे.
बहुतांश भारतीय - हर्गुआन विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थी दिसत आहेत. वँग यांच्यावर असलेल्या आरोपांचा विद्यापीठाच्या अस्तित्वावर परिणाम होणार नाही, असा खुलासा वेबसाईटवर करण्यात आला आहे. वँग यांनी राजीनामा दिला असून ज्यांच्याकडे कायदेशीर व्हिसा आहे त्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दिलासा विद्यापीठाने दिला आहे.