आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Age progression Software Lets You See Your Child As An Adult News In Marathi

बाळाची प्रौढावस्था दाखवणारे सॉफ्टवेअर; वॉशिंग्टन विद्यापीठातील महत्त्वपूर्ण संशोधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - आपले लाडके बाळ मोठे झाल्यानंतर कसे दिसेल, याची कल्पना प्रत्येक आई-वडील करतात. अशा पालकांसाठी ही खुशखबर आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांना नवीन सॉफ्टवेअरकडून काही सेकंदांत मिळेल.

बाळाच्या प्रौढावस्थेविषयीची उत्सुकता अनेक पालकांना असते. आताची मऊ काया आणि अनेक वर्षांनंतरचे सुरकुत्या पडलेले शरीर यातील अंतर कापून त्याचे प्रत्यक्ष छायाचित्र दाखवण्याची किमया साधणारे हे सॉफ्टवेअर आहे. स्वयंचलित तंत्राचा समावेश असलेल्या सॉफ्टवेअरमुळे काही सेकंदांत काळाच्या पुढे जाऊन मुलांचा चेहरा मांडण्याची पद्धती यातून प्रत्यक्षात आली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रोफेसर केमेलमाचर-श्लिझरमन यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे तंत्र विकसित केले आहे. आम्ही मुलांचे फोटो मुक्त अवस्थेत असताना टिपले. त्यावर सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया झाली.

इंटरनेटची मदत
नवीन व्यक्तीचा फोटो तयार करण्यासाठी इंटरनेटवरील हजारो फोटोंचा ढोबळमानाने उपयोग करून घेतला जातो. त्यासाठी सर्वसाधारणपणे लागणारे पिक्सेल शोधून काढण्याची व्यवस्था या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे.