आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक सरकारविरोधात लाहोरमध्ये आंदोलन, पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - इस्लामाबादमधील जोरदार निदर्शनानंतर इम्रान खान समर्थकांनी आता लाहोरच्या रस्त्यांवर सरकारविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)ने सोमवारी लाहोरमध्ये विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले, तर दोन्ही पक्षांनी चर्चेची प्रक्रिया पुढे नेली असून उभय पक्षांतील प्रतिनिधींनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दस्तऐवजांचे आदान-प्रदान केले.

दरम्यान, २०१३ मधील निवडणुकांमधील कथित घोटाळ्याच्या मागणीसाठी पीटीआय कार्यकर्त्यांनी लाहोरमध्ये विविध ठिकाणी टायर जाळले आणि १८ ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. निदर्शकांनी माल रोडस लिबर्टी चौक, भुट्टा चौक, टाऊन हॉल चौक आणि पंजाब विधानसभेच्या दिशेने जाणारा रस्ता जाम केला.

सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमपीएल-एन)च्या कार्यकर्त्यांनीही या वेळी प्रत्युत्तरादाखल निदर्शने केली.इम्रान समर्थकांनी बळजबरीने दुकाने आणि इतर व्यावासायिक संकुल बंद पाडल्याचा आरोप त्यांनी केला. लाहोरमधील हिंसक कारवायांपासून बचाव करण्यासाठी पीएमपीएलने आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना रस्त्यावर न उतरण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पीटीआयचे महासचिव जहांगीर तरीन यांच्याशी अनौपचारिक चर्चेनंतर केंद्रीय मंत्री इशाक दार म्हणाले की, पीटीआयच्या नेत्यांशी काही कागदपत्रांची देवाण-घेवाण झाली आहे.