आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation Against Sharif Government In Pakistan, Divya Marathi

पाकमध्ये शरीफविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर, कादरी-इम्रान यांची आंदोलने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात पुन्हा एकदा सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इस्लामाबादेत मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पद सोडावे, देशात नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करत हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

इम्रान खान आणि कॅनडातील धर्मगुरू तहिरूल कादरी या दोघांनी नवाझ शरीफ सरकारविरुद्ध आंदोलन छेडले आहे. खान यांचा आझादी मार्च, तर कादरी यांचा क्रांती मार्च आहे. कादरी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी 14 ऑगस्टला केलेल्या आंदोलनामध्ये शरीफ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. शनिवारी हा मोर्चा राजधानीत धडकला. शरीफ सरकारला या आंदोलनाचा फटका बसू शकतो. त्यामुळे हे पूर्वनियोजित आंदोलन दडपण्यासाठी सरकारनेही अनेक पावले उचलली आहेत.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश : नवाझ शरीफ व त्यांचे बंधू शाहबाज शरीफसह 20 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या एका न्यायालयाने दिले आहेत. शाहबाज पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत.
पुन्हा एकदा सत्तांतराचे वारे सरकार बरखास्त करा
४आंदोलन शांततेत पार पडेल. शरीफ यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर संसदेची सभागृहे बरखास्त करण्यात यावीत. नवीन व्यवस्था त्या जागी येईल असे धर्मगुरू तहिरूल कादरी म्हणाले.
कादरींच्या समर्थकांचीही धडक : कॅनडातील धर्मगुरू कादरी यांचेही हजारो समर्थक राजधानीत वेगळ्या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचे समर्थक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले.