आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्जेरियाचे AH-5017 विमान दुर्घटनाग्रस्त, 110 प्रवाशांसह 6 क्रू मेंम्बर्स मृत्युमुखी पडल्याची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुर्कीनो फासो - एअर अल्जेरियाचे AH- 5017 हे प्रवासी विमान पश्चिम आफ्रिकेजवळ असलेल्या नायजर येथे कोसळले. या विमानातून प्रवास करणार्‍या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानात 110 प्रवाशांसोबत चालक दलातील 6 सदस्य प्रवास करत होते.
अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर अल्जेरियाच्या AH- 5017 या विमानाने बुर्कीनो फासोवरून अल्जेरियाला जाण्यासाठी उड्डाण केले होते. यानंतर केवळ 50 मिनिटांतच या विमानाचा संपर्क तुटला. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे विमान मध्यरात्री 1 वाजून 50 मिनिटांनी रडारवर शेवटचे दिसले. ठरलेल्या वेळेनुसार सकाळी पाच वाजता अल्जेरियाला हे विमान पोहोचायला हवे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ढगाळ वातावरणामुळे या विमानाला मार्ग बदलण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर हे विमान रडारवरून गायब झाले होते. स्पॅनिश प्रायव्हेट एअरलाईन्स कंपनीने दिलेल्या माहितीत एअर अल्जिरीच्या या विमानाचा संपर्क तुटला होता. दरम्यान, एअर अल्जीरीने आपातकालीन आराखड्यानुसार कामास सुरूवात केली होती.

विमान अपघातासंदर्भातील या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी बुधवारी तैवानच्या एका विमान अपघातात 51 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर त्यापूर्वी युक्रेनमध्ये एका विमानाला मिसाईल हल्ल्यात उडवण्यात आले होते. त्यात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले होते.
पुढील स्लाईडवर पाहा... कसा होता या विमानाचा प्रवास...