आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्जेरियाच्या विमानाचे अवशेष सापडले, मालीमधील वाळवंटात कोसळले विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुर्कीनो फासो: बुर्कीनो फासोवरून अल्जियर्सला 116 प्रवाशांना घेऊन जात असलेले AH-5017 या विमानाचे अवशेष बुर्कीनो फासोच्या सीमेजवळील माली या भागात मिळाले आहेत. या विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उ़ड्डाण केल्याच्या 50 मिनीटानंतर हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 5.10 मिनिटाला माली आणि नायजीरीच्या सीमेवर असलेल्या एका वाळवंटात कोसळले.

बुर्कीनो फासोचे जनरल गिलबर्ट डियानडीरी यांनी सांगितले की, आम्हाला अल्जेरियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष मिळाले आहेत. बुर्कीनो फासोपासून 50 किलोमिटरच्या अंतरावर हे अवशेष सापडले आहेत. घटनास्थळी उपस्थिती असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने विमानाला गोसी भागात पडताना पाहिले आहे. आम्ही या संदर्भातील सर्वच माहितीची गंभीर दखल घेत आहोत.

अल्जेरियाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेवेळी हे विमान अल्जेरियाच्या सीमेजवळच होते. ढगाळ वातावरणामुळे चालकाला दिसत नसल्याने तसेच अल्जियर्स-बमाको या मार्गावर दुसर्‍या विमानाशी धडक होऊ नये म्हणून चालकाला मार्ग बदलण्याचे आदेश देण्यात आले. मार्ग बदलताच विमानाशी संपर्क तुटला. सुरूवातीला विमान बेपत्ता झाल्याच्या बातम्या येताच अल्जेरियाने आपातकालीन योजना बनवली होती.

पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या कंपनीचे होते विमान आणि कोणकोणत्या देशातील नागरिक करत होते प्रवास