आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Asia Crash First Pictures Released Of Plane Underwater

AirAsia: समुद्राच्या तळाशी आढळला विमानाचा मागील भाग; ब्लॅकबॉक्सचा शोध सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- एअर एशियाचे दुर्घटनाग्रस्त झालेले विमान QZ8501च्या मागील भागाचा शोध घेण्यास सर्च एंड रेस्क्यू टीमला यश आल्याचे प्रमुख हेनरी बॅमबॅंग सोएलिस्त्यो यांनी सांगितले. या कामात मानवरहित अंडरवाटर व्हेकल्सची मदत घेण्यात आली. विमानाचा मागील भाग समुद्राच्या तळाशी आढळला असून त्याचा पहिले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आला आहे.

विमान दुर्घटना कशी झाली, याबाबात लवकरच माहिती मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. विमानाच्या मागील भागात 'ब्लॅकबॉक्स' अथवा 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' असतो. त्यामुळे शोध पथक आता ब्लॅकबॉक्सचा शोध घेत आहेत.

दरम्यान, 24 डिसेंबरला इंडोशेनियाहून सिंगापूरच्या दिशेने जाणारे एअर एशियाचे विमान अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. इंडोनेशियाच्या सुरबाया विमानतळावरून 162 प्रवाशांना घेऊन उड्डान केलेल्या या विमानाचा सकाळी सव्वा सहाच्या सुमारास संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विमानाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 40 मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी 16 जणांची ओळख पटली आहे.

'मल्टी नेशन सर्च ऑपरेशन'च्या 11 व्या दिवशी पहिल्यांदा विमानाचा मोठा भाग आढळल्याची माहिती मिळाली आहे. समुद्रातील पाण्याचा प्रवाह आणि व्हिजिबिलिटीच्या अभावामुळे विमानाचे अवशेष आणि प्रवाशांचे मृतदेह शोधण्यात अनेक समस्या येत आहेत. मात्र, सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशनच्या अधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेऊन विमानाचा मागील भाग शोधून काढल्याचे सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशनचे प्रमुख हेनरी बॅमबॅंग सोएलिस्त्यो यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा, समुद्राच्या तळाशी आढळलेल्या विमानाच्या मागील भागाचे फोटो...