आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Asia Crash First Pictures Released Of Plane Underwater, News In Marathi

एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्‍लॅक बॉक्स मिळण्याची शक्यता वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता/सिंगापूर - एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या शेवटच्या टोकाचा भाग जावा समुद्रात सापडला आहे. यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडण्याची आशा वाढली आहे. ब्लॅक बॉक्समधून विमानाच्या अपघाताच्या कारणाची निश्चित उकल होईल.

समुद्रात सापडलेली वस्तू विमानाचा मागचा भाग असल्याचे इंडोनेशियाचे शोध मोहिमेचे प्रमुख बामबँग सोलसि्टियो यांनी सांगितले. पथक आता ब्लॅक बॉक्सचा शोध घेईल. पाण्याखाली घेण्यात आलेल्या छायाचित्राच्या तुकड्यात एअर एशिया एअरबस ए ३२०-२०० लिहिलेले दसिते. हा तुकडा विमानाच्या शेवटच्या ज्ञात ठिकाणापासून ३० किमी अंतरावर आढळला. या भागातच ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्समधून विमानाचा, हवेचा वेग, लँडिंग गिअर व वैमानिकाच्या संपर्क यंत्रणेचा तपशील मिळू शकतो. सोनर स्कॅनच्या साहाय्याने तुकडा ट्रॅक झाल्याचे सांगण्यात येते.

एअर एशियाचे विमान सुराबायाहून सिंगापूरला जात असताना २८ डिसेंबर रोजी अपघातग्रस्त झाले होते. विमानातील ४० मृतदेह मिळवण्यात आतापर्यंत यश मिळाले आहे. उर्वरित बहुतांश मृतदेह विमान अवशेषात अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.