आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Asia Plane Accident News In Marathi, Co pilot Control The Plane

एअर एशिया दुर्घटना: सहवैमानिक चालवत होता विमान; डाटा रेकॉर्डरची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियाच्या सुराबायाहून सिंगापूरला जाताना अपघातग्रस्त झालेले विमान सहवैमानिक चालवत होता, अशी माहिती फ्लाइट डाटा रेकॉर्डरमधून उघड झाली आहे. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा समितीचे प्रमुख मारजोनो सिस्वोसुवार्नो यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
क्यूझेड ८५०१ विमान अपघातावेळी फ्रान्सचा सहवैमानिक चालवत होता. त्याच्या बाजूला बसलेला वैमानिक निगराणी करत होता. अपघाताआधी विमान योग्य उंचीवर होते, असे सिस्वोसुवार्नो यांनी सांगितले. विमान अपेक्षेपेक्षा जास्त उंचीवर होते, असा अंदाज दुर्घटनेवेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, विमान योग्य स्थितीत होते हे आता स्पष्ट झाले आहे. चालक दलाकडे परवाना आणि मेडिकल फिटनेस होते. असे असले तरी अंतिम अहवाल येण्यासाठी सहा-सात महिने लागणार आहेत. २८ डिसेंबर रोजी झालेल्या या अपघातात विमानातील सर्व १६२ प्रवासी ठार झाले होते. बचाव पथकाच्या शोध मोहिमेत केवळ ७० मृतदेह हाती लागले.

दरम्यान, वर्षभरापूर्वीच्या बेपत्ता एमएच ३७० विमानास मलेशियन एअरलाइन्सने अपघातग्रस्त ठरवले आहे. विमान कंपनी मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणार आहे.