आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेवर चालणारी हायब्रीड कार लवकरच येतेय!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - प्युजिएट या फ्रेंच कार उत्पादक कंपनीने हवेवर चालणारी हायब्रीड कार तयार केली असून या कारमुळे इंधनाच्या खर्चामध्ये तब्बल 45 टक्के कपात होणार आहे. या कारमध्ये बसवण्यात आलेले सर्वसाधारण कॉम्बुशन इंजिन, विशेष प्रकारचे हायड्रॉलिक्स आणि ऊर्जेची साठवण व उत्सर्जन करणा-या कॉम्प्रेस्ड एअर सिलिंडरसह असलेल्या अडॉप्टेड गिअर बॉक्सच्या साहाय्याने हवेवर चालणा-या या कारची एकूण व्यवस्था चालते. या यंत्रणेवरच ही कार पेट्रोल किंवा हवा किंवा दोन्हीवरही संयुक्तपणे चालते

बॅटरीचीही गरज नाही
पेट्रोल आणि कॉम्प्रेस्ड एअरवर चालणा-या हायब्रीड एअर इंजिन सिस्टिमची ही क्रांतिकारी गाडी हायब्रीड कारच्या दुनियेतील नवा चमत्कार असून ऊर्जेच्या साठवणुकीसाठी या कारमध्ये महागड्या बॅटरीज बसवण्याचीही अजिबात गरज नाही. कोणत्याही सामान्य कारमध्येही कोणताही बदल न करता सहज बसवता येते.