आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांनो, कृपया पैसे काढा इंधनाचे पैसे द्यायचे आहेत..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- 'प्रवाशांनो कृपया आपले पॉकेट्स काढा, इंधनाचे पैसे द्यायचे आहेत', असा आवाज विमानातील माइकवरुन आला तर? ही वस्तुस्थिती आहे. बुधवारी एअर फ्रान्सच्या 562 या विमानात ही घोषणा करण्यात आली.
हे विमान पॅरिसहून लेबनॉनची राजधानी बैरुतला जात होचे. बैरुत विमानतळावर तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आल्यामुळे हे विमान गृहयुद्धाच्या आगीत होरपळत असलेल्या सिरियाची राजधानी दमास्कसच्या विमानतळावर उतरवण्यात आले. आणीबाणीची परिस्थिती असल्यामुळे विमानातील प्रवाशांना त्यांच्याकडे नगदी पैसे असतील तर इंधन घेण्यासाठी ते द्यायला सांगण्यात आले होते, असे एअर फ्रान्सच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले. सिरियावर निर्बंध लादण्यात आल्यामुळे तेथे नगदी रकमेखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे इंधन खरेदी करता येत नाही. नंतर इंधन खरेदीसाठी अन्य मार्ग शोधण्यात आल्यामुळे प्रवाशांकडून पैसे घेण्याची गरज भासली नाही. हे विमान तेथून सायप्रसला नेण्यात आले आणि दुसर्‍या दिवशी तिथून ते बैरुतमध्ये आणण्यात आले. बैरुत विमानतळावर सिरियाचे अध्यक्ष असाद यांच्या सर्मथकांनी मुख्य धावपट्टीवर गर्दी केल्याने विमान वाहतूक खोळंबली होती.
त्यामुळे एअर फ्रान्सच्या विमानाची चांगलीच अडचण झाली होती. नंतर लेबनॉनच्या सैनिकांनी असाद यांच्या सर्मथकांना मुख्य धावपट्टीवरून बाजूला केले आणि वातावरण निवळले.
संयुक्त राष्ट्राने हात टेकले- सिरीयातील प्रचंड हिंसाचारापुढे संयुक्त राष्ट्राने हात टेक ले असून येत्या रविवारपासून निरीक्षकांच्या निगराणीची मोहिमच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद आणि बंडखोर फौजांमध्ये समेट घडवण्यात या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या पथकाला अपयश आल्यामुळे संयुक्त राष्ट्राने हा निर्णय घेतला आहे. निरीक्षकांची मोहिम रविवार मध्यरात्रीपासून ही मोहीम थांबवण्यात येत असल्याची घोषणा शांतता मोहिमेची सहायक सरचिटणीस एडमंड मुलेट यांनी सांगितले. 15 सदस्यीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.यासंबंधीचे पत्र सरचिटणीस बान कीन मून यांनाही पाठवले असल्याचे ते म्हणाले.