आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airplane Home Creation At America, News In Marathi

भंगारात जाऊ नये म्हणून विमान खरेदी करून बनवले ड्रीम होम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्टलँड- अमेरिकेतील ओरेगन राज्यातील ब्रुस कॅम्पबेल यांनी एक विमान खरेदी केले आहे. याचा वापर ते चालवण्यासाठी नाही तर राहण्यासाठी करत आहेत. त्यांनी विमानाला ड्रीम होमचे रूप दिले आहे. ब्रुस इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून त्यांनी वर्षभरापूर्वी बोइंग 727 विमान खरेदी केले. विमान ठेवले ती दहा एकर जागा त्यांनी 23 हजार डॉलरला खरेदी केली होती. येथे मालवाहू गाड्यांमध्ये राहण्याची त्यांची इच्छा होती, परंतु मिसिसिपीमध्ये एका हेअर डेसरने निवृत्त झालेले बोइंग विमान विकण्यास काढल्याचे समजल्यावर त्यांनी ते विमान खरेदी केले. इतके मोठे विमान भंगारात जावे, असे मला वाटत नव्हते म्हणून 60 लाखांना मी ते खरेदी केले, असे ते म्हणतात.

साफसफाईची विशेष काळजी : या विमानाची लांबी 153 फूट आहे. त्याचे सर्व पाटर््स सुस्थितीत आहेत. कॅम्पबेल सांगतात की, माझी जीवनशैली खूप साधी आहे. बंद डब्यातून मी साधे जेवण मागवतो. ड्रीम होमची मी खूप स्वच्छता ठेवतो. माझे घर पाहायला कुणी आले तर स्लिपर किंवा मोजे घातल्याशिवाय मी आत हिंडूफिरू देत नाही. आतील भाग घाण होऊ नये म्हणून ही काळजी घेतो.

विमानातील घर ठरले कुतूहलाचा विषय । कॅम्पबेल यांच्या या ड्रीम होमचे एफराने (एअरक्राफ्ट फिटी रिसायकलिंग असोसिएशन) कौतुक केले आहे. एफराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दरवर्षी जगभरात 500 ते 600 विमाने रिटायर होतात. त्यानंतर बहुतांश विमाने भंगारात काढली जातात. अशी विमाने भंगारात काढण्याऐवजी त्याचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे कॅम्पबेल यांनी दाखवून दिले आहे.
माझ्या मनात विमानाचे ‘घर’
कॅम्पबेल यांनी सांगितले की, मी जरी या विमानात राहत असलो तरी हे विमान माझ्या मनात ‘घर’ करून बसले आहे. मी त्याला जिवापाड जपतो. जपानमध्ये यापेक्षा अधिक मोठे घर बनवण्याची माझी योजना असून त्यासाठी मी बोइंग - 747 खरेदी करण्याची तयारी करत आहे. दोन्ही घरांत मी सहा - सहा महिने राहीन.