आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केनियात विमानतळ पेटले, आग विझविण्यास बंब मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील जोमो केनयाट्टा विमानतळात बुधवारी पहाटे भीषण आग लागली. धगधगत्या ज्वाळा आणि धुराचे काळेकुट्ट लोट पाहता शहरावरच काळोख पसरल्यासारखे वाटत होते. विमातळावर प्रवासी इमिग्रेशनच्या परिसरात पहाटे 5 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वा.) आगीचा भडका उडाला. प्रवासी पटापट बाहेर पळाले. पण विमातळावर आग विझविण्यासाठी पुरेसे बंबही नव्हते. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सायंकाळी आग आटोक्यात आली.