आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AKB48 Pop Star Shaves Head After Breaking Band Rules

बॉयफ्रेंडला भेटणा-या जपानी तरुणीची मुंडण करून क्षमायाचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - बॉयफ्रेंडला भेटणे हा काही गुन्हा ठरत नाही, परंतु त्यामुळे जपानमध्ये एका पॉप स्टार तरुणीवर बँडमधील करिअर गमावण्याची वेळ आली आहे. नोकरी जाऊ नये म्हणून तिने आपले मुंडण करून माफी मागितली. तिला बॉयफ्रेंडसोबत रात्र घालवणे महागात पडल्याचे सांगण्यात आले.

मिनामी मीनिगिशी असे या तरुणीचे नाव आहे. यू-ट्यूबवर क्षमा याचना करणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. त्यात तिने आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. एकेबी-48 या बँडला आपण सोडू इच्छित नाही, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. बॉयफ्रेंडच्या घरातून बाहेर पडताना एका वृत्तपत्राने तिचा फोटो प्रकाशित केल्यानंतर मीनिगिशी जाहीरपणे समोर आली. तिचा बॉयफ्रेंड पुरुष बँडमध्ये डान्सर आहे. बँड व्यवस्थापनाने मीनिगिशीला पदावरून हटवले आहे. आता ती बँडमध्ये एक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणार आहे. मीनिगिशीने जाहीरपणे माफी मागितली. एवढे करण्याची खरे तर त्याची काहीही गरज नव्हती, असे तिच्या काही चाहत्यांनी म्हटले आहे.

डेटिंगला मनाई - एकेबी-48 बँडमध्ये काम करणा-या सदस्यांना परस्परांमध्ये डेटिंग करण्यास मनाई आहे. बँडचा तसा दंडक आहे. त्याचे उल्लंघन झाले तर सदस्याला डोक्यावरील केस काढून टाकून माफी मागावी लागते. ही बँडची परंपरा आहे.

गोडगुलाबीचा अतिरेक - बँडमधील मुली जपानमधील टीव्ही आणि थिएटरमध्ये नियमितपणे हजेरी लावतात. हा बँड क्यूट इमेज अर्थात गोड गुलाबीपणाचे प्रदर्शन करणारा आहे. जपानसह अनेक आशियाई देशांत असे बँड चालवले जातात. बँडमधील सदस्य पुरुषांसोबत रिलेशनशिप ठेवत नसतील तरच त्यांना मोठे यश मिळते. अर्थात त्यांच्या चाहत्यांचा विश्वास तोडू नये, अशी त्यामागील धारणा आहे.

काय आहे एकेबी 48 ? - जपानमधील सर्वाधिक लोकप्रिय बँड अशी एकेबी 48 ची ओळख आहे. हा बँड 2005 मध्ये स्थापन करण्यात आला. बँडमध्ये 90 तरुणींचा समावेश असतो. त्यात 14 ते 20 वर्षांच्या तरुणींचाही समावेश असतो. या बँडचे टोकियोत दररोज कार्यक्रम होतात.