Home »International »Other Country» Akbar Is No Coward, He Will Surrender, Says Asad

असाद अखेर प्रकटले!

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 03:00 AM IST

  • असाद अखेर प्रकटले!

दमास्कस - राजवटीविरोधात असंतोष आणि देशात अराजक माजले असताना गेल्या सहा महिन्यांपासून दडून बसलेले सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद रविवारी अखेर प्रकटले. सरकारी टीव्हीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात असाद यांनी प्रथमच सार्वमत घेण्याचे आणि विरोधकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.

देशातील बंडखोरांना पाश्चात्य जगताचे ‘गुलाम’ आणि ‘दहशतवादी’ असल्याचे टिका करून विरोधकांशी चर्चा करू मात्र लष्कराविरूद्ध शस्त्र उचलणारे आणि विदेशी शक्तीचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांशी चर्चेची आपली तयारी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी राष्ट्राला उद्देशून करण्यात आलेल्या भाषणात असाद यांचा सूर नरमल्याचे दिसून आले. देशातील विरोधकांनी आपल्याशी जरूर चर्चा करावी. त्यामुळे देशातील हिंसाचार थांबू शकेल. परंतु बंड करणा-या नागरिकांशी आपण कदापिही चर्चा करणार नाहीत. कारण हे बंड खरे नाही. या बंडखोरांना पाश्चात्य देशांची फूस आहे, असा आरोप असाद यांनी केला. देशातील परिस्थितीविषयी घेण्यात येणारा निर्णय शुद्ध सिरियन असला पाहिजे. त्यासाठी आपल्या सरकारने एक योजना तयार केली आहे. लवकरच आपली योजना जाहीर करू.

देशातील स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी विशिष्ट विरोधकांशी संपर्क साधण्यात आला आहे. परदेशातून आदेश मिळणा-या बंडखोरांनी चर्चेस येऊ नये, असे असाद सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दर अल-असाद सांस्कृतिक आणि कला केंद्रामधील खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात असाद यांनी आपली भूमिका मांडली. आपल्या भाषणात असाद यांनी बंडखोरांना ‘दहशतवादी गट ’ असे संबोधले. सरकार सिरियातील नागरिक आणि राजकीय पक्षांसोबत चर्चेस तयार आहे, असे सांगितले.

गेल्या वर्षीच्या जूननंतर असाद यांनी पहिल्यांदाच रविवारी जाहीर सभेत हजेरी लावली. बंडखोर हे पाश्चात्यांचे सेवक आहेत. आपण सेवकाशी नव्हे तर मालकाशी चर्चा करू. दहशतवादी कल्पना घेऊन जगणा-या लोकांशी आपण वाटाघाटी करू शकत नाहीत. वाटाघाटीमध्ये बंडखोर नव्हे तर सामान्य जनता सहभागी होणे आवश्यक आहे. काही लोक सिरियात फूट पाडून देशाला दुबळे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आमचे सार्वभौमत्व कायम राहील. मजबूत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फंडींग बंद करा - इतर देशांनी सिरियातील बंडखोरांना शस्त्रासाठी पैसा पुरवणे बंद केले पाहिजे. त्यांचा निधी बंद झाला तरच देशातील लष्करी कारवाया थांबवता येतील, असे असाद यांनी स्पष्ट केले.

काय मांडली योजना ? -देशाचे राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी राष्ट्रीय घोषणापत्र तयार करण्यात येईल. त्यावर जनतेचा कौल जाणून घेण्यात येईल. घोषणापत्रानंतर देशाची संसदीय निवडणूक होईल आणि नवीन सरकार स्थापन होईल, अशी ही योजना आहे. यासंदर्भात राष्ट्रीय चर्चा घडवण्यात येईल, असे असाद यांनी म्हटले आहे.

Next Article

Recommended