आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhilesh Yadav Boycott Lecture In Harvard Business School

हार्वर्ड बिझनेस स्‍कूलच्‍या व्‍याख्‍यानावर अखिलेश यादव यांचा बहिष्‍कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांची बोस्‍टन विमानतळावर झालेल्‍या चौकशीवरुन वाद वाढत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांनी यांनी या घटनेचा निषेध म्‍हणून हार्वर्ड बिझनेस स्‍कूलमधील व्‍याख्‍यानाचा बहिष्‍कार केला. तसेच भारतीय कॉन्‍सूल जनरल ज्ञानेश्‍वर मुळे यांच्‍यातर्फे आयोजित भोजनाच्‍या कार्यक्रमातही न जाण्‍याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्‍य सचिव जावेद उस्‍मानी यांनी यादव यांच्‍याऐवजी महाकुंभावर व्‍याख्‍यान दिले. कार्यक्रमात अखिलेश यादव यांच्‍या भाषणाची वेळ आली त्‍यावेळी ते उठून निघून गेले.

हार्वर्ड बिझनेस स्‍कूलमध्‍ये अखिलेश यादव आणि आझम खान यांचे महाकुंभाच्‍या आयोजनवर व्‍याख्‍यान होणार होते. आझम खान यांच्‍यावर महाकुंभ आयोजनाची संपूर्ण जबाबदारी होती. परंतु, बोस्‍टन विमानतळावर त्‍यांना अडविण्‍यात आले आणि त्‍यांची सुमारे तासभर चौकशी करण्‍यात आली. केवळ मुस्लिम असल्‍यामुळेच आपल्‍यासोबत अशा प्रकारचे वर्तन करण्‍यात आले, असे आझम खान यांनी या घटनेनंतर सांगितले.

दरम्‍यान, आझम खान यांचा दिल्‍लीच्‍या आंतरराष्‍ट्रीय विमानतळावरही सुरक्षा अधिका-यांसोबत वाद झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. बोस्‍टनला रवाना होण्‍यापूर्वी समाजवादी पार्टीचे खासदार मुनव्‍वर सलीम हे त्‍यांची भेट घेण्‍यासाठी विमानतळावर गेले होते. त्‍यावेळी त्‍याना अडविण्‍यात आले होते. त्‍यावरुन त्‍यांनी वाद घतला होता.