आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी यंत्रणेत अल-कायदाची घुसखोरी, हमासचेही गुप्तहेर संस्थांमध्ये प्यादे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी सरकार आणि दहशतवादी संघटना यांच्यातील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण अल-कायदासह अनेक दहशतवादी संघटना अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.

सीआयएकडे आलेल्या प्रत्येकी पाच अर्जांपैकी एका उमेदवाराचा संबंध दहशतवादी किंवा अपहरण करणार्‍या एखाद्या संघटनेशी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सीआयए हादरले आहे. सुरक्षेच्या पातळीवर धोका निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) अंतर्गत पातळीवर 4 हजारांहून अधिक वेळा तपास केला. त्यातून कर्मचार्‍यांतील संशयितांच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला होता. ज्या कर्मचार्‍यांच्या वागण्या-बोलण्यात सामान्यपणा दिसत नाही त्यांच्या नोंदी ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कार्यालयातील संशयास्पद लोकांना त्यानंतर सरकारकडून इशाराही देण्यात आला होता. हे लोक गोपनीय माहितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर त्यांना याविषयीच्या सॉफ्टवेअरचीदेखील पुरेशी माहिती होती. असे दोन कर्मचारी असल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आले होते. अंतर्गत पातळीवर झालेल्या तपासात स्नोडेनचा मात्र समावेश नव्हता.