आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Al Qaeda Announces India Wing, Renews Loyalty To Taliban Chief

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल कायदा भारतात सुरू करणार नवीन विंग, VIDEO द्वारे दिली धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाने भारतीय उपखंडात आपली नवी शाखा सुरू करण्याची घोषणा केली आहे. इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या एका 55 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अलकायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीने म्हटले आहे की, अल कायदाची ही नवी शाखा इस्लामी राज्याला पाठिंबा देइल आणि भारतीय उपखंडात जेहादचा झेंडा नव्याने रोवला जाईल. हा व्हिडिओ जारी केल्यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. गृह मंत्रालयाने गुप्तचर संस्था (आईबी) ला या व्हिडीओची सत्यता पडताळण्याचे निर्देश दिले आहेत.

जवाहिरीने भारतीय उपखंडात अल कायदा ची शाखा बनवण्याबाबतही वक्तव्य करताना भारतीय शहरांचा उल्लेख केला आहे. तो म्हणाला, अल कायदाची नवी शाखा बर्मा (म्यानमार), बांग्लादेश, आसाम, गुजरात, अहमदाबाद आणि काश्मीरमध्ये मुस्लीमांना अभिमानाने संघटनेमध्ये सहभागी करून घेईल. ही नवी शाखा अत्याचार आणि शोषणापासून मुस्लीमांना मुक्ती मिळवून देईल.
ISIS समोर अल कायदाच्या वयस्कर नेत्यांना संघटना चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे इराक आणि सिरियाच्या सीमेवाहेर नवीन जेहादी तयार करण्याचे काम संघटना करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मोदींना आव्हान
जवाहिरीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आव्हान दिले आहे. भारतातील मुस्लीम विरोधी घटनांवर मौन बाळगणे हा मुस्लीमांना विरोध असल्याचे त्याने म्हटले आहे.
व्हिडिओ पाहा, पुढील स्लाइडवर...