आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Al Qaeda Making Explosives That Airport Scanners Can\'t Detect

\'ISIS\'च्या दहशतीने अल-कायदाचेही धाबे दणाणले; 9/11 सारख्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराक आणि सीरियामध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धामुळे इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड अल-शाम'ची (आयएसआयएस) ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अल कायदा या दहशतवादी संघटनेचे धाबे चांगलेच दणाणले आहे. भविष्यात अल कायदा आपले शक्तीप्रदर्शन करण्‍यासाठी जगात पुन्हा एकदा 9/11 सारखा मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. अल-कायदा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी आणखी विस्फोटक बनू शकते. एअरपोर्ट स्कॅनर्समध्येही दिसणार नाही, असे शस्त्रास्त्राचा वापर अल-कायदा भविष्यात करू शकते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत हाय अलर्ट जारी करण्‍यात आल्याचे समजते.
एका इंग्रजी न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 'इस्लामिक स्टेट इन इराक
अॅण्ड अल-शाम' अर्थात आयएसआयएसची वाढती ताकद पाहून अल कायदा या संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. आयएसआयएस वाढती ताकद आणि त्यांची आर्थिक क्षमता यामुळे अल कायदाचे धाबे दणाणले आहे.
कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याने 24 वर्षांपूर्वी अल-कायदाची स्थापना केली होती. तेव्हा अल कायदाकडे 200 मिलियन डॉलर आणि तालिबानीकडे 70 मिलियन डॉलरचा निधी होता. दुसरीकडे, गेल्या जानेवारीमध्ये अल-कायदापासून वेगळे होऊन सुन्नी दहशतवाद्यांनी स्वतंत्र चुल मांडली आहे. 'आयएसआयएस' या नावाने संघटना स्थापन केली आहे. मोसुलमध्ये त्यांनी पहिला हल्ला करून 450 मिलियन डॉलर्सचा निधी गोळा केला आहे. याशिवाय आयएसआयएसने इराक आणि सीरियातील अनेक तेल विहिरी ताब्यात घेतल्या आहे. त्यांची किंमत 4 बिलियन डॉलर्सच्या घरात आहे.

सिक्युरिटी एक्सपर्ट्सनुसार, आयएसआयएसची आर्थिक क्षमता आणि मनुष्यबळ पाहता अल-कायदा खूप दुबळी ठरली आहे. त्यामुळे अल कायदा सध्या तरी आयएसआयएसशी दोनहात करू शकत नाही. मा‍त्र, संपूर्ण जगात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी अल-कायदा अमेरिकेतील 9/11 सारखा मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणू शकते. अल कायदा अमेरिकेतील एअरपोर्ट्‍सवर स्फोट घडवू शकते, असा अमेरिकन सुरक्षा एजेंसीने अलर्ट जारी केला आहे.

अमेरिकन थिंक टँकने सांगितले, येणारा काळ कठीण आहे. भविष्यात अल-कायदा 9/11 सारखा हल्ला करू शकते. मोठा दहशतवादी हल्ला करून जगात आपला दबदबा कायम राहावा म्हणून अल कायदा तयारी करत आहे. याशिवाय क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन यांचा हत्येनंतर अल-कायदाला सौदी अरबमधून मिळणारा निधी बंद झाला आहे. त्यामुळे सध्या अल-कायदाला मोठ्या निधीची आवश्यकता आहे.

एअरपोर्ट स्कॅनरलाही हुलकावणी देणा‍री स्फोटके....
अल-कायदा सध्या एअरपोर्ट स्कॅनरलाही हुलकावणी देणारी स्फोटके बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीला मिळाली आहे. या स्फोटकांचा वापर करून अल कायदा अमेरिकेतील एअरपोर्ट्‍सला टार्गेट करू शकतो. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील सर्व एअरपोर्ट्सच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

आयएसआयएसला कुठून ‍मिळतो निधी?
आयएसआयएसच्या मुख्य आर्थिक स्रोत 'एक्सटॉरशन' (खंडणी मागणे) हा आहे. सुन्नी दहशवादी ट्रक चालक आणि व्यावसायिकांकडून जबरदस्तीने वसुली करतात. संघठनेने अनेक बँका आणि गोल्ड शॉप लुटले आहे. सुन्नी दहशतवाद्यांचे नेटवर्क खूप मोठे आहे. आयएसआयएस संघटनेने नुकतेच इराकमधील मोसुल शहर ताब्यात घेतले आहे. तेथून सुमारे 429 मिलियन डॉलर्स लुटले आहे. सध्या जगातील दुसरी सगळ्यात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे.
यूएस आर्मी वॉर कॉलेजने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयएसने आपल्या प्रत्येक फायटरला 200 डॉलर प्रति महिना मानधन देणे सुरु केले आहे. आर्थिक प्रलोभन दाखवून जास्तीत जास्त दहशवाद्यांना आपल्या संघटनेत सहभागी करून घेतले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रक्कामध्ये सुन्नी दहशतवाद्यांनी काढलेल्या परेडची छायाचित्रे... दहशवादी शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत...
( फोटो: सीरियातील रक्का प्रांतात मिलिट्री परेड घेताना आयएसआयएसचे दहशतवादी)
(Image Source - Reuters)