आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Al Quada Pakistani Chief Death, Pakistani Military Claim

अल-कायदाच्या पाकिस्तानी म्होरक्याचा कारवाईत खात्मा, पाकिस्तानी लष्कराचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - अल-कायदाच्या दहशतवादी कारवायांचा प्रमुख अदनान शुक्रिजुमा याचा खात्मा झाला आहे, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला. अमेरिकेसह अनेक ठिकाणच्या दहशतवादी हल्ल्यांच्या कटाचा तो मास्टरमाइंड होता. पाकिस्तानी लष्कराने गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी वझिरिस्तान भागात जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेत शुक्रिजुमा ठार झाला. जागतिक कारवायांचा प्रमुख म्हणून तो दहशतवादी संघटनेत सक्रिय होता.
शनिवारी पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्याच्या विरोधात केलेल्या कारवाईत अल-कायदाचा कमांडर अदनान ठार झाला व अन्य पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम बाजवा यांनी िट्वट करून जाहीर केले. २००३ मध्ये ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ने शुक्रीजुमा हा अमेरिकेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, असे म्हटले
होते. ११ सप्टेंबर २००१ मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या मोहंमद अट्टा सारखाचा शुक्रीजुमाचा जगाला धोका आहे.

अमेरिकेला अनेक दिवसांपासून वाँटेड
आमच्या भूमीवर थारा नाही
पाकिस्तानच्या भूमीवर एकाही दहशतवाद्याला स्थान नाही. कोणत्याही दहशतवाद्याला थारा दिला जाणार नाही.
राहिल शरीफ, लष्करप्रमुख, टि्वटरवरून.

शुक्रिजुमा मूळचा सौदी अरेबियातील
शुक्रिजुमा हा मूळचा सौदी अरेबियातील आहे. त्याने १५ वर्षे अमेरिकेत वास्तव्य केले होते. त्याचे वडील ब्रुकलिनच्या मशिदीत काम करत असत. नंतर त्यांचे कुटुंब फ्लोरिडाला स्थलांतरित झाले होते. १९९० मध्ये तो अफगाणिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला होता.

मोठी लष्करी कारवाई
पाकिस्तानने आपल्या भूमीवर केलेल्या लष्करी कारवाईत आतापर्यंत १ हजार १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला आहे. त्यात १०० सैनिकांचा मृत्यू झाला.

अफगाण सीमा टार्गेट
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर दहशताद्यांची पकड आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने या प्रांताला लक्ष्य केले आहे. अल-कायदा आणि तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे तळ आढळून आले आहेत. हे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम करण्यात येत आहे.

कराची विमानतळावर हल्ला
या वर्षी जून महिन्यात देशातील सर्वात वर्दळीच्या कराची विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामागे शुक्रिजुमाचा हात होता.

न्यूयॉर्क कटाचा सूत्रधार
न्यूयॉर्कमधील उपनगरीय मार्ग उडवून देण्याचा कट शुक्रीजुमाने केला होता. त्याचबरोबर मॅनहॅटन मधील दहशतवादी हल्ल्याचा कटही त्याने शिजवला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांमध्ये शुक्रिजुमाचाही समावेश होता. अमेरिकेने त्याच्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.