आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकच्या फलुजा शहरावर अल-कायदाचा कब्जा, राजकीयदृष्‍ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणार्‍या फलुजा शहरावर दहशतवादी संघटना अल-कायदाने चढाई करून त्यावर कब्जा केला. अल-कायदाशी संबंधित लोकांनी उर्वरित शहर आपल्या ताब्यात घेतले आहे. शहरात सर्वत्र बंदूकधारी लोक फिरू लागले आहेत. त्यांनी सर्व ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलास शहराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर पोलिस ठाण्यातील शस्त्रे लुटून ठाण्याला जाळून टाकण्यात आले.
रामादी शहरात सुरक्षा जवानांनी सुन्नी अरबांच्या तळावर हल्ला केला. त्यानंतर हा हिंसाचार उसळला. शिया नेतृत्वाखालील सरकारने सुन्नी समुदायाचे हक्क काढून घेतले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून सुन्नी सर्मथक आणि सुरक्षा जवान यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. फलुजा आणि रामादीमधील संघर्षामुळे लष्कर आणि अल-कायदाशी संबंधित इस्लामिक स्टेट ऑफ इराक यासह इतर सुन्नी गट समोरासमोर आले आहेत.