आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Al Quaeda Puts Bounty Of Rs 20 Crore On Salman Rushdie

सलमान रश्‍दींच्‍या हत्‍येसाठी अल कायदा देणार 20 कोटींचे बक्षीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतीय वंशाचे लेकख सलमान रश्‍दी यांच्‍याविरुद्ध अल कायदा या दहशतवादी संघटनेने फतवा काढला आहे. रश्‍दी यांना जिवंत किंवा मृत पकडणा-याला 20 कोटी रुपयांचे बक्षीस अल कायदाने जाहीर केले आहे.

अल कायदाने संघटनेची इंग्रजी पत्रिका 'इन्‍सपायर'च्‍या ताज्‍या अंकात इस्‍लामची निंदा करणा-या व्‍यक्तींची यादी जाहिर केली आहे. त्‍यात रश्‍दी यांचे नाव आहे. इराणचे दिवंगत धार्मिक नेते अयातुल्‍ला खोमिनी यांनी 1989 मध्‍ये रश्‍दी यांच्‍याविरोधात फतवा काढला होता. रश्‍दी यांचे पुस्‍तक 'सेटेनिक व्‍हर्सेस' या विरोधात हा फतवा काढण्‍यात आला होता. त्‍यावेळी रश्‍दी यांच्‍या हत्‍येसाठी 4 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्‍यात आले होते. आता ही रक्‍कम 20 कोटींपर्यंत वाढविली आहे.